प्रत्येक व्यक्तीला आपले दात पांढरेशुभ्र असावे असे वाटेत. सुंदर दात हे सौंदर्यासोबतआरोग्याचेही लक्षण आहे दातांची योग्य निगा राखली तर दात चांगले व पांढरे शुभ्रदिसतात जेंव्हा व्यक्तीच्या चेहेऱ्यावर हसू उमलते तेंव्हा अश्या दंतपंक्ती मुळे त्याव्यक्तीच्या चेहेऱ्याचे सौंदर्य चांगलेच खुलून दिसते.
आपल्यापैकी बरेच लोक दातांची चांगली काळजी घेतांना दिसून येतात, तरीदेखील दात पांढरेशुभ्र नाही होत. त्यांच्यादातांवर पिवळे डाग असतात, जेणेकरून हसल्यावर त्यांचे दात चांगले दिसत नाही.दातांचे पिवळेपणा आणि काळे डाग ही हे दातांवर प्लेक असल्याचे लक्षण असतात, प्लेक एक विशिष्ट प्रकारच्या बॅक्टेरिया मुळे तयार होतात.दातांवरील किटन काढून दात पांढरे करण्याचे उपाय जर तुम्ही योग्य वेळी करालतर तुमचे दातांवरचे डाग निघू शकतात आणि दात पांढरे होऊ शकतात.
तुमचे हसणे सुंदर असेल तर तुमचे व्यक्तिमत्व ही चांगले वाटते, म्हणून दातांवरचे डागकाढून ते पांढरे करणे महत्वाचे आहे. दात पांढरे करण्याचे काही उपाय आपण इथे थोडे सविस्तरपणे बघणार आहोत.
प्लेक आणि टार्टर काय असतात ?
प्लेक हा दातावर जमा होणारा बॅक्टरीया चा थर आहे. अन्न खाल्यावर दातांवर अन्नाचे काही कण जमा होतात व त्यामुळे बॅक्टरीया दातांवर आपला जम बसवतात. प्लेक वर उपचार करणे फार सोपे आहे आणि नियमित दातांची काळजी घेतल्याने प्लेक जमा होण्याचे संभावना कमी होते.
टार्टर जास्त चिवट असते आणि प्लेकवर लवकर उपचार न केल्याने तो दातांवर जमा होऊ लागतो. टार्टर हे फार खोलवर जाऊ शकते आणि हिरड्याना त्रास होऊ शकतो. टार्टर चे उपचार जास्त कठीण आहे, जे पूर्ण दात खराब करू शकतात. ह्यावर लवकर उपाय करणे हाच एक उत्तम मार्ग आहे.
दातांना पिवळेपणा येण्यामागचे काय कारण आहेत?
- बरोबर ब्रश न करणे
- अधिक गोड़ खाणं खाणे
- धूम्रपान, तंबाखू, इत्यादी चे सेवन करणे
- खाऊन झाल्यावर तोंड बरोबर न धुणे
- दातांच्या स्वच्छतेची चांगली काळजी न घेणे
- डेंटिस्ट कडे नियमित तपासून न घेणे
दात पांढरे करण्याचे उपाय कोणते आहेत?
दात पांढरे करण्याचे उपाय हे घरगुती पद्धतीने किंवा डेंटिस्ट च्या उपचाराने करूशकतो.
घरगुती उपचार:
1. बरोबर ब्रश करणे
दात जर चांगले ठेवायचे असतील तर पहिले तुम्हाला दातांना चांगला ब्रश करणे गरजेचे आहे . चांगला ब्रश केल्याने दातांवरचे प्लेक आणि इतर बॅक्टरीया साफ होतात. दात दिवसातून २-३ वेळा डॉक्टरांनी सांगितलेल्या पध्दतीने घासले गेले पाहिजेत किंवा प्रत्येक जेवणानंतर दात घासले तर अति उत्तम, एक सकाळी झोपून उठल्यावर आणि दुसरे रात्री झोपायच्या अगोदर.
असे केल्याने दातावर प्लेक जमा नाही होत. नेहमी दातावर आणि हिरड्यांवर हलक्या हाताने ब्रश करावे, जे तुमचेदात अधिक चांगले ठेवतील.
2. बेकिंग सोडा चा वापर करणे
बेकिंग सोडा हा प्लेक, टार्टर, आणि बॅक्टरीया साफ करण्यासाठी फार गुणकारी आहे. थोडासा बेकिंग सोडा हा ब्रश वर घ्यावा आणि दात साफ करावे. असे केल्याने दातांचा पिवळेपणा दूर होतो आणि दात अधिक पांढरे दिसू लागतात.
3. मीठ व लिंबूचा वापर.
मीठ व लिंबू वापरल्याने दातांवरचे प्लेक आणि टार्टर फार चांगल्या पद्धतीने साफ होऊ शकतात. निंबू मध्ये प्लेक साफ करण्याचे सामर्थ्य आहे आणि ते कोणतीही जखम लवकर बरे करण्यास उपयुक्त ठरते.
4. गोड़ पदार्थ कमी खाणे
गोड़ पदार्थ हे मुख्य कारण आहे जेणेकरून दातावर प्लेक व बॅक्टरीया जमा होऊ लागतो. ह्यामुळे लवकर दातावर कीड पकडते आणि ते दात लवकर सडू लागतात. म्हणून गोड़ पदार्थ कमी खाणे आणि जरी ते खाल्ले तर तोंड चांगले धुणे फार गरजेचे आहे.
5. संत्र्याच्या सालांनी दात घासावे
संत्र्याची साल दातांवरचे प्लेक,आणि टार्टर साफ करण्यात फार गुणकारी आहे. संत्र्याची साल दातावर घासल्याने दातांवरचे प्लेक आणि टार्टर चांगले साफ होतात,जे तुमचे दात पांढरे करण्यास उपयुक्त ठरते.
6. फ्लॉसिंग करणे
दातांच्या अवघड जागेत जमा होणाऱे अन्न द्रव्य साफ करणे कठीण आहे कारण तिथे ब्रश पोहचू शकत नाही. हे छोटे अन्नद्रव्य नंतर दात खराब करू लागतात आणि त्यावर पिवळेपण येतो. फ्लॉसिंग ने हे अन्न द्रव्य चांगले साफ करू शकतो.त्यामुळे तिथे प्लेक आणि बॅक्टरीया जमा होणे कठीण होते.
7. ऑइल पुलिंग
ऑइल पुलिंग हे जास्त करून नारळाच्या तेलाने केले जाते. ह्या प्रक्रियेत दातांवरचे प्लेक आणि बॅक्टरीया सैल होऊन निघून जातात. ह्या प्रक्रियेत तुम्हाला तोंड चांगले साफ करणे फारमहत्वाचे आहे, कारण त्यांमध्ये बॅक्टरीया आणि इतर किटाणू असतात. ह्यामुळे बऱ्याचप्रमाणात तुम्ही दात चांगले करू शकतात.
डेंटल उपचार
1. स्केलिंग
स्केलिंग हि प्राथमिक पद्धत आहे जे डेंटिस्ट तुमचे दात साफ करण्यासाठी करतात. हे तुमच्या दातांचा पिवळेपणा साफ करतो आणि दात अधिक पांढरेकरण्यात उपयुक्त ठरते.
2. फ्लोराईड उपचार
फ्लोराईड उपचारामध्ये तुमचे दात हे योग्य प्रमाणात फ्लोराईड असलेले मिश्रण वापरून साफ केले जाते. ह्यात असलेले फ्लोराईड तुमच्या दातांवरचे प्लेक आणि बॅक्टरीया काढण्यात उपयुक्त ठरते. जे दातावर पिवळेपणा येण्यापासून वाचवतात.
3. दात सफेदीकरण
दात सफेदीकरण पद्धत दात पांढरे करण्यासाठी फार उपयुक्त आहे. ह्यात व्यक्तीचे दात छान पांढरे होतात त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्व उठून दिसतो आणि व्यक्तीचे हास्य अधिकच सुंदर दिसू लागते. वरील सर्व मार्ग तुम्हाला दातांचा पिवळेपणा काढायला उपयुक्त ठरते. ते दातांवरचेप्लेक, टार्टर, आणि बॅक्टरीया साफ करण्यात फार उपयुक्त आहे. दात पांढरेकरण्याचे उपाय जर योग्य पद्धतीने केले तर तुमचे दात चांगले साफ होऊ शकतात.
तज्ञांचे मत
चला तर मग लवकरच हे उपाय सुरु करा जेणेकरून तुमचे दात चांगले साफ होऊन ते अधिक पांढरे करण्यास उपयुक्त ठरतील.