लहान मुलांच्या दातांची काळजी कशी घ्यावी?

Talk to a Dentist Now!

लहान मुलांच्या दातांची काळजी घेणे ही एक प्रत्येक पालकाची महत्वाची जबाबदारी आहे. वयाच्या साधारण सहाव्या महिन्या नंतर बाळाला दुधाचे दात यायला सुरू होतात. वयाच्या सुरुवातीला हे दात थोडे छोटे असतात आणि साधारण अडीच ते तीन वर्षात ते पूर्णपणे येतात. हे दात 9 ते 10 वर्षापर्यंत टिकतात, नंतर ते एकेक करून पडायला लागतात किंवा काढावे लागतात.

दातांची निगा

आता काही पालक दुधाच्या दातांना जास्त महत्व देत नाही. बघायला गेलं तर दुधाचे दात हे इतकेच महत्वाचे आहे जितके की कायमचे दात. बऱ्याच लहान मुलांना दातांच्या किडण्याचे त्रास होत आहे. यामुळे त्यांना दात दुखत असतात आणि जेवण जेवताना त्रास देखील होतो. म्हणून लहान मुलांना दुधाच्या दातांना लागणारी कीड, कारणे, आणि आणि त्याचे उपाय समजणे हे फार महत्त्वाचे आहे. यासंबंधीच्या सर्व गोष्टी आपण येथे तपशीलवार पाहू.

कोणत्या कारणामुळे बालकांच्या दातांना कीड लागते?

लहान मुलांच्या दातांना कीड सहज लागते, त्याची कारणे समजली तर ते आपण त्याचे प्रमाण कमी करू शकतो.

लहान मुलांच्या दाता मध्ये कीड लागण्याची काही कारणे खाली नमूद केले आहेत:

1. ब्रश बरोबर न करणे

बरेच लहान मुले ब्रश करण्याच्या प्रक्रियेला जास्त महत्व देत नाही. ते फक्त पालकांच्या दबावामुळे हलकाफुलका ब्रश करतात. त्यांची ब्रश करण्याची पद्धत ही बरोबर नसते, ज्यामध्ये ते दात आणि हिरड्यांवर बरोबर ब्रश करत नाही. यामुळे मुळे खड्डे पडतात आणि त्यामुळे इतर किटाणू बरोबर साफ होत नाही. लहान डोके असलेला ब्रश वापरणे येथे महत्वाचे आहे.

2. बरोबर टूथपेस्ट न वापरणे

बरेच पालक आपल्या बालकांना अगदी तीच टूथपेस्ट देतात, जे ते स्वतः वापरतात. परंतु लहान बालकांना वेगळ्या पद्धतीचे टूथपेस्ट जरुरी आहे, जेणेकरून त्यांचे दात आणि हिरडी उत्तमरीत्या असतील.

3. जास्त गोड पदार्थ खाणे

लहान बाळा मध्ये गोड पदार्थ खाण्याचे प्रमाण फार जास्त असते. त्यामध्ये चॉकलेट हा पदार्थ त्यांना सहज आवडणार आहे. यामुळे दातांवर गोड पदार्थाचे अवशेष राहतात आणि त्यावर बॅक्टेरिया जमा होऊ लागतात. त्यामुळे दातांवर लवकर कीड पकडायला सुरुवात होते.

4. तोंड व्यवस्थित न धुणे

बरेच बालक तोंड बरोबर साफ करणे टाळतात. ज्यामुळे दातांवर कीड जमते आणि आणि त्यांना बरेचसे दंत संबंधी त्रास होतात. ही काही ही मुख्य कारणे आहेत, ज्यामुळे बालकांमध्ये दात किडण्याचे प्रमाण वाढते. दातांचे दुखण्याचे प्रमाण हे त्या दाताच्या किडण्यावर अवलंबून आहे.

लहान मुलांच्या दुधाच्या दाताची काळजी घेणे का महत्त्वाचे आहे?

  • दात किडणे थांबवू शकतो
  • खाण्या वेळी दात दुखणे याला टाळू शकतो
  • डेंटिस्टकडे जाणे कमी करू शकतो
  • चांगले दुधाचे दात हे पुढे कायमच्या दातांना चांगले फायदे देतात

दंतवैद्य यांचा सल्ला

लहान मुलांच्या दातांची निगा कशी राखावी?

आपण आता जाणलं आहे की लहान मुलांचे दुधाचे दात हे तितकेच महत्त्वाचे आहे जेवढे की कायमचे दात. तरी याची बरोबर निगा घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बरोबर निगा घेण्याकरता पालकांनी फक्त काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, जे दात उत्तम प्रकारे ठेवण्यास मदत करतील.

दातांची निगा राखण्याची काही गोष्टी इथे नमूद केल्या आहेत:

1. लहान मुलांना गोड कमी देणे

लहान मुलांना गोड पदार्थ कमी दिल्यामुळे त्यांना कीड लागण्याची प्रमाण फार कमी होऊ शकते. यामध्ये चॉकलेट, साखर, मिठाया, इतर बरेचसे गोड पदार्थाचे प्रमाण कमी करावे. असे करून आपण आपल्या लहान बाळाच्या दुधाचे दात हे चांगल्या प्रकारे आपण ठेवू शकतात.

2. बरोबर ब्रश करणे

ब्रश बरोबर न करणे ब्रश करणे ही दातांची काळजी घेण्याची फार मूलभूत प्रक्रिया आणि ती बरोबर करणे महत्त्वाचे आहे. ब्रश करताना ब्रश दातावरून बरोबर गोलाकार पद्धतीने फिरवावा, त्यामुळे दातातील छोटे अन्नकण निघून जाण्यास मदत होईल. एका दिवसातून ब्रश हा दोन वेळा करणे आवश्यक आहे, एक सकाळी झोपून उठल्यावर आणि आणि दुसरा रात्री झोपण्यापूर्वी. लहान मुले किमान तीन वर्षांचे होईपर्यंत, पालकांनी स्वतः त्यांची ब्रश करण्याची प्रक्रिया करावी.

3. हिरडी साफ करणे

दातां बरोबर, याची काळजी घेणे हे फार महत्त्वाचे आहे. बाळाच्या जन्मापासून ते तीन वर्षापर्यंत, पालकांनी ओल्या रुमालाने त्यांचे दात व हिरडी साफ करून घ्यावे.

4. फ्लॉसिंग करणे

पाच वर्षापेक्षा जी मुले मोठी असतील त्यांना फ्लॉसिंग प्रक्रिया तुम्ही शिकवू शकता. फ्लॉसिंग केल्यामुळे तुमच्या अवघड दातांच्या ठिकाणावरून बारीक खड्यापर्यंत साफ करू शकतात, त्यामुळे दात किडण्याचे प्रमाण ही कमी होऊ शकते.

5. दंतवैद्य यांचा सल्ला

तुम्हाला जरी तुमच्या मुलांच्या दातांच्या संबंधित काही त्रास आढळला नाही, तरी तुम्हाला दंतवैद्याकडे भेट देणे फार गरजेचे आहे. बऱ्याच मौखिक आरोग्य संबंधित त्रुटी या सुरुवातीला नाही समजत. परंतु दंत वैद्याकडून तपासणी केल्यावर दातां संबंधित बरेच असे त्रास समजून घेऊ शकतात. असं केल्याने पुढचे असे बरेच वर्ष दातां संबंधिततील त्रास तुम्ही टाळू शकतात. दंतवैद्य तुम्हाला उत्तम प्रकारे दातां संबंधिततील औषध देऊ शकतात.

वरील दिलेले काही मुद्दे हे लहान मुलांच्या दातांची निगा कशी राखावी तुम्हाला सांगतात. ही सगळी काळजी प्रत्येक पालकांनी यांनी घेणे फार महत्त्वाचे आहे. दुधाचे दात हे प्रत्येक लहान मुलांसाठी फार महत्त्वाचे आहेत आणि त्यांची काळजी घेतल्याने बरेच त्रास आपण टाळू शकतो. लहान मुले हे दातां संबंधिततील गोष्टीबद्दल अज्ञान असतात, त्यांना बरोबर ज्ञान देणे जरुरी आहे. बरोबर दातांची निगा राखल्याने मौखिक आरोग्य चांगले राहते.

तज्ञांचे मत:

लहान मुलांच्या दातांची निगा राखणे हे फार महत्वाचे आहे, यामुळे तुम्ही बरेचसे दातां संबंधित त्रास टाळू शकतात. एक दंतवैद्य तुम्हाला दातांचे काळजी कशी घ्यायची हे सहज चांगल्या प्रकारे सांगू शकतो त्यामुळे तुमचे मौखिक आरोग्य शुद्ध होण्यास मदत होईल.

About Author

Share

Your email address will not be published. Required fields are marked *

Sabka dentist Clinics