दातांची उत्तमरीत्या काळजी घेणे हे कोणत्याही व्यक्तिला तितकेच महत्त्वाचे आहे, जेवढे कि त्याच्या संपूर्ण शरीराची काळजी घेणे. आपले हसणे तेव्हाच सुंदर दिसते जेव्हा आपले दात चांगले असतात. जर दात किडलेले किंवा अस्वच्छ असतील तर ते कसे बरे सुंदर दिसतील? तेच जर दातांची काळजी उत्तमरित्या घेतली तर हेच दात चांगल्या प्रकारे राहतील.
काळजी न घेतल्याने दात दुखू शकतात, जे की फार त्रासदायक होऊ शकते. खूप सारे दात दुखण्यावर घरगुती उपाय आहेत ज्याने करून हा त्रास थांबवू शकतो आणि आपण आपले दात उत्तम प्रकारे ठेवू शकतो. दातांची बरोबर काळजी न घेतल्याने बरेच प्रकारे दातांची समस्या उद्भवू शकते. या सर्व त्रासांपासून मुक्त व्हायचे असेल तर चांगल्या प्रकारे दातांची काळजी घेणे हेच एक उत्तम पर्याय आहे.
काळजी न घेतल्याने दातांची कोणती समस्या होऊ शकते?
काळजी बरोबर न घेतल्यामुळे दातांच्या बऱ्याच अशा समस्या उद्भवू शकतात.
इकडे काही दातांच्या समस्या आहेत त्या तुम्हाला होऊ शकतात:
- दातांची सळसळ
- हिरडी मध्ये दुखणे
- तोंडामधून दुर्गंधी येणे
- दात किडणे
वरील नमूद केलेले काही मुख्य दातांची लक्षणे आहेत जे मनुष्याला त्रास देऊ शकतात. याकरता दातांची बरोबर काळजी घेतली तर हेच दातांना चांगले ठेवू शकते.
दातांची काळजी घेण्यासाठी कोणते उपाय करावे?
दात दुखणे यावर घरगुती उपाय आहेत आणि औषधी उपायही आहेत.
इथे आपण दोन्ही उपाय बघणार आहोत.
घरगुती उपाय:
योग्य प्रकारे ब्रश करणे
दात चांगले ठेवण्यासाठी ब्रश करणे ही एक साधी आणि सोपी प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया बहुतेक लोकं करतातच परंतु त्यातून ही बहुतेक लोकांना दातांच्या समस्या उद्भवतात. याला एक कारण म्हणजे दातांना बरोबर ब्रश न करणे हे आहे. कधीही हिरड्या वर आणि दातांवर दाबून ब्रश करू नये.
दातांवर ब्रश करताना देखील गोलाकार पद्धतीने ब्रश फिरवायला हवा. नेहमी लक्षात ठेवा की ब्रश दिवसातून कमीत कमी दोन वेळा करायलाच पाहिजे. एक म्हणजे सकाळी झोपून उठल्यावर आणि आणि दुसरा म्हणजे रात्री झोपण्या अगोदर ब्रश करणे हे महत्त्वाचे आहे.
आहारात साखरेचे प्रमाण कमी करणे
आपल्या आहारात साखर ही कमी किंवा जास्त प्रमाणात असते, आणि ती शरीराला थोड्या मात्रा मध्ये आवशक्य सुद्धा असते. पण दातावर साखरेचे प्रमाण फार काळ राहिल्यावर, त्यावर ‘बॅक्टेरिया’ होण्याच्या संभावना होऊ शकतात. ही बॅक्टेरिया, दातांची सळसळ, दात किडणे ही समस्या आणि बरेच काही समस्या निर्माण करू शकतात. ही बॅक्टेरिया, दातांची सळसळ आणि दात किडणे या समस्या आणू शकतात. म्हणून जास्त गोड खाणे टाळणे आणि आहारात कमी साखर असणे हे महत्त्वाचे आहे.
लवंग वापरणे
लवंग ही दात दुखी वर फार गुणकारी उपाय आहे. जर कोणताही दात दुखत असेल तार त्यावर लवंग किवा लवंगाचे तेल एका कापसाच्या बोळ्यावर टाकून दाताखाली ठेवावा. हा उपाय केल्याने काही साइड इफेक्ट्स होत नाही आणि दातांचं दुखणं हे देखील कमी होण्यास मदत होते.
तेलाने चूळ भरणे
तेलाने चूळ भरण्यामुळे, दातांमध्ये कीड आणि छोटे जिवाणू हे नाहीसे होण्याची शक्यता असते. यामुळे दातांचे दुखणे बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते.
भरपूर पाणी पिणे
भरपूर पाणी पिल्यावर, दातांवरचे आम्लं युक्त पदार्थ कमी होण्यास मदत होते. जास्त पाणी पिल्याने लाळेचे प्रमाण ही वाढते जे दातांना ‘प्लेक्यू’ आणून किडन्या पासून दूर ठेवते. पाणी पिल्यावर ‘तोंड कोरडे पडणे’ अशा प्रकारची समस्याही कमी होऊ शकते.
एकंदरीत बघितले तर तोंडाच्या बरेच अशा समस्या पूरक पाणी पिल्यामुळे कमी होण्यास मदत होते. वरील नमूद गोष्टी काही मुख्य दात दुखीवर घरगुती उपाय सुद्धा आहेत. या पर्यायामुळे तुमच्या समस्या कमी करू शकतात अथवा तुम्ही टाळू सुद्धा शकता.
डेंटिस्टचे उपाय
समस्यांचा मूळ शोधणे
डेंटिस्टकडे गेल्याने, ते आपल्याला दातांचे बरोबर निरीक्षण करून समस्यांच्या मूळ शोध काढतात. एकदाका दातांच्या समस्यांचा मूळ भेटल्यावर, त्यावर उपाय शोधणं फार सोपे होते.
दात स्वच्छ करणे
दातांवर आणि हिरड्यांवर काही प्रमाणात अन्नाचे कण साचून राहतात, जे बऱ्याच दातांच्या समस्येला कारणीभूत असतात. बराच काळ हे अन्न साचून राहिल्याने, ‘प्लेक’ निर्माण होते आणि दात किडतात. याकरता, डेंटिस्ट दात स्वच्छ करतो त्यामुळे बरेच दातांच्या समस्या दूर होतात.
योग्य औषध घेणे
दातांची समस्या ही कधीही उद्भवणारी गोष्ट आहे, तर त्यावर एक बरोबर पर्याय म्हणजे योग्य औषध घेणे होय. एक डेंटिस्ट तुम्हाला तुमच्या समस्ये प्रमाणे बरोबर औषध सुचवू शकतो, जेणेकरून तुमची दातांची समस्या कमी होईल. सुचवलेले औषध बरोबर घेऊन तुम्हाला बऱ्याच प्रमाणात दातांच्या समस्या वर पर्याय काढता येईल.
हे सर्व डेंटिस्ट कडून भेटणारे पर्याय आहेत, जे तुमची दातांची समस्या कमी करतील.
तुम्हाला प्रत्येक वेळा खाऊन झाल्यावर योग्य प्रकारे तोंडाची साफ सफाई करणे गरजेचे आहे. यामुळे तुमच्या तोंडातले सगळे अन्नद्रव्य साफ होतील. दातांची समस्या कमी करण्याकरता, त्यामधले ‘बॅक्टेरिया’ कमी ठेवणे फार गरजेचे आहे. वाढते ‘बॅक्टेरिया’ चे प्रमाण हे दात दुखणे या मागचे मुख्य कारण आहे.
वरील नमूद केलेले दातांची कीड, उपाय, आणि उपचार, हे नक्कीच तुम्हाला अनेक दातांसंबंधी तील समस्या दूर करण्यास मदत करतील. इतकेच नव्हे तर जरी तुम्ही घरगुती उपाय कराल, तरीही तुम्हाला एकातरी डेंटिस्टकडे जाऊन तपासणी करावी लागेल. ते तुमची समस्या बरोबर समजून घेऊन, तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील. जेवढं शक्य होईल तेवढं, वरील नमूद पर्याय वापरण्याचा प्रयत्न करा.
तज्ञांचे मत
दातांची काळजी योग्यरीत्या घेऊन तुम्ही बरेच दातांच्या समस्या टाळू शकतात. याकरता तुम्हाला योग्य तो दात दुखण्यावर घरगुती उपाय करायला हवा.