हिरड्याच्या समस्यांमागे कोणती कारणे आहेत?
दातांची समस्या ही त्रासदायक आहे, जे प्रत्येकाला कधीतरी अनुभवाला येतोच. जसा दाता संबंधित त्रास अनेकांना सतावतो, तसेच हिरड्यांचा त्रास देखील बऱ्याच जणांना सतावतो.
हा त्रास ही मौखिक आरोग्याशी संबंधित आहे. हिरड्या ही तितकेच महत्त्वाचे आहेत, जितके की आपले दात, म्हणून ह्या बद्दल सतर्क असणं फार गरजेचं आहे. हिरड्यांचा त्रास असलेल्या व्यक्तीला हिरड्यांमधून रक्त येणे ही पहिली लक्षणे आहेत. बरेच जण या लक्षणांवर आणि हिरड्या संबंधीतील समस्येवर दुर्लक्ष करतात.
आपल्याला हिरड्या जर उत्तम पणे ठेवायचे असतील तर हिरड्या दुखणे वर उपाय लवकर करावे लागतील. हे न केल्यास पुढे फार त्रास होऊ शकतो. इथे आपण हिरड्या संबंधीतील अजुन गोष्टी जाणून घेऊया. यामुळे तुम्हाला हिरड्यांच्या समस्यांपासून सुटका मिळेल.
हिरड्यासंबंधीतील समस्यांची लक्षणे कोणती आहेत?
तुम्हाला खाली दिलेली लक्षणे असतील तर तुम्हाला हिरड्या संबंधित त्रास आहे.
ती लक्षणे अशी आहेत:
- हिरड्या मधून रक्त स्त्राव होणे .
- हिरड्यांना सूज येणे.
- हिरड्या फार दुखणे.
- गरम किंवा थंड पदार्थ खाल्ल्यावर हिरड्यावर संवेदनशीलता होणे.
- दात खीळ खीळ होणे.
- श्वासातून दुर्गंधी येणे.
हिरड्यांच्या त्रासाचे किती प्रकार आहेत?
हिरड्यांच्या त्रासाचे दोन मुख्य प्रकार आहेत : जिनगीविटीस आणि पीरियडॉन्टायटीस
1. जिनगीविटीस
जिनगीविटीस हा हिरड्या संबंधित पहिला प्रकार आहे, जो पहिल्या टप्प्याला होतो. यामध्ये काही मुख्य लक्षणे म्हणजे हिरड्या मध्ये रक्त येणे, हिरड्या लाल होणे, खाताना हिरड्या फार दुखणे असे आहेत. जिनगीविटीस हा इलाज सहज करण्यासारखा आहे.
2. पीरियडॉन्टायटीस
पीरियडॉन्टायटीस हा हिरड्या संबंधित दुसऱ्या टप्प्या वरचा आजार आहे. जिनगीविटीस चा पहिला टप्प्यावर इलाज नाही केला तरच पीरियडॉन्टायटीस चा आजार दुसरा टप्पा येतो. म्हणून लवकरच जिनगीविटीस या टप्प्यातच हिरड्यांचा समस्येचा इलाज करणे गरजेचे आहे. पेरिओडॉण्टिटीस चा त्रास हा कधी कधी जबड्या पर्यंत जातो, जेणे करून फार त्रास होतो. ह्या मुले काही केसेस मध्ये दात खीळ खिळे होतात.
हिरड्यांच्या त्रासाला “पायोरिया” हि म्हटलं जात. हिरड्या दुखीवर वर उपाय हा लवकरात लवकर करणे फार महत्त्वाचे आहे.
हिरड्या सुजणे यावर उपाय कोणकोणते आहेत?
हिरड्यांच्या संबंधित जो पण त्रास होतो , त्याचे मुख्य कारण त्यावर ‘बॅक्टरीया’ हा जमाव आहे. हे बॅक्टेरिया जर हिरड्यांवर वाढत गेले तर ते हिरड्या संबंधीतील त्रासाला कारणीभूत ठरतात. म्हणून आपल्याला हिरड्या सुजणे यावर उपाय लवकरात लवकर करायला हवे, कारण त्यामुळे नंतर वेदना होऊ शकतात.
हिरड्या दुखी वर काही उपाय इथे नमूद केले गेले आहे:
1. ब्रश बरोबर न करणे
दात बरोबर ब्रश करणे हे पहिली महत्वाची गोष्ट आहे ज्यांनी दात आणि हिरड्या चांगले राहतात. दात ब्रश करण्याबरोबर, हिरड्यांना साफ करणे हे देखील महत्वाचे आहे. ब्रश करताना हिरड्या वरून हलक्या हाताने ब्रश फिरून ते साफ करावे. दात साफ करताना ही तुम्हाला हिरड्या बरोबर 45 डिग्री अँगल घेऊन करायला हवा. एका दिवसातून ब्रश हा दोन वेळा करणे आवश्यक आहे, एक सकाळी झोपून उठल्यावर आणि आणि दुसरा रात्री झोपण्यापूर्वी यामुळे हिरड्या वरच्या बॅक्टेरिया व प्लेक साफ होतात.
2. फ्लॉसिंग बरोबर करणे
फ्लॉसिंग मध्ये दातांच्या अवघड जागी अडकलेल्या छोटे अन्नपदार्थ साफ करतात. फ्लॉसिंग केल्यामुळे बॅक्टेरिया व प्लेक साफ करणे सोपे जाते. फ्लॉसिंग ही दिवसातून एकदा तरी करावा.
3. गोड पदार्थ कमी खाणे
गोड पदार्थ हे एक मुख्य कारण आहे,ज्यामुळे बॅक्टेरिया हिरड्यावर जमा होतात. त्यामुळे गोड पदार्थ खाणे कमी करावे, जेणेकरून बॅक्टेरिया हिरड्यांवर जमणे कमी होते. गोड पदार्थ खाल्ल्यावर बरोबर तोंडाची साफसफाई करणंही महत्त्वाचे आहे, जेणे करून हिरड्यांवर गोड पदार्थ जमा होणार नाहीत.
4. तोंडाची साफसफाई नियमित करणे
तोंडाची साफसफाई नियमित करणे हे फार महत्त्वाचे आहे, जेणेकरून हिरड्यांवरचे आणि दातांवरचे अन्नद्रव्य साफ होते. असं केल्याने हिरड्यांवर बॅक्टेरिया जमा होण्याची संभावना फार कमी आहे.
5. आहार चांगला घ्यावा
आहार हे दात आणि हिरड्या संबंधित बाबतीत फार परिणाम करतात. चांगला आहार हिरड्यांना फार मजबूत बनवतात. यामुळे हिरड्या संबंधितील त्रास होत नाही.
6. मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करणे
मिठाचे पाणी हे दात आणि हिरड्या संबंधितील त्रासाला फार गुणकारक ठरते. मिठाचे पाणी हे बॅक्टेरियाला नष्ट करतात, ज्यामुळे हिरड्या चे त्रास लवकर बरे होऊ शकतात. असे केल्याने हिरड्यांचा त्रास ही लवकर बरा होऊन जातो. म्हणून मिठाच्या पाण्याच्या गुळण्या खास करून सकाळी खाली पोट असताना गुळण्या केल्यावर हिरड्यांचा त्रास कमी होतो. हा योग्य उपाय हिरड्यांचा त्रास कमी करण्यासाठी खूप योग्य आहे.
7. दंतवैद्याकडे भेट देणे
हिरड्यांचा त्रास कमी करायला जरी बरेच उपाय असले तरी, एकदा दंतवैद्याकडे हिरड्या तपासणे महत्त्वाचे आहे. तुमच्या हिरड्यांचा त्रास बरा होऊ शकतो आणि त्याची तीव्रता जाणू शकतो. ते तुम्हाला योग्य ते कारण समजून हिरड्या दुखीवर उपाय उत्तम रित्या देऊ शकतात. डेंटिस्ट बरोबर औषध देतील जेणेकरून हिरड्यांचा त्रास लवकर बरे होण्यास फायदा होईल.
वरील नमूद केलेले हिरड्या सुजणे वरचे उपाय उत्तमरित्या तुम्हाला आराम देतील. हे उपाय नियमित केल्याने तुम्हाला बराच आराम भेटू शकेल. जिनगीविटीस जास्त दुखत नसल्यामुळे, हे आजार असलेल्या लोकांना लगेच कळून नाही येत. त्यामुळे तुम्हाला थोडं जरी हिरड्यांचा त्रास बद्दल काही त्रास झाला तर लगेच दंतवैद्याकडे जाऊन भेट घेणे गरजेचे आहे. हिरड्यांच्या त्रासाला कधीही हलक्याने घेऊ नये. चांगल्या हिरड्या हे तुम्हाला उत्तम मौखिक आरोग्य देऊ शकतात.
तज्ञांचे मत:
तुम्हाला हिरड्या संबंधी काहीही त्रास झाला तर दंतवैद्याकडे लगेच जाऊन त्यावर बरोबर इलाज करावा. हिरड्यांच्या त्रासाला कमी करण्याकरता, बरेच उपाय आहे आहेत ते बरे करू शकतात.