ऑर्थोडोंटिक उपचाराने दातांच्या चुकीच्या संरचनाची  समस्या कशी दूर करावी?

Talk to a Dentist Now!

तुमचं हसणं हे फार महत्वाचे आहे जे तुमच्या बद्दल बरच काही सांगून जाते. चांगले हसणं हे सगळ्यांना शक्य नाही होत, ज्याचे कारण आहे दातांचे रचना बरोबर नसणे. दात वेडेवाकडे असणे हे काही नवीन समस्या नाही आहे, ही समस्या बर्याच जणांमध्ये आदळून येते. पुढे असलेले दात, वेडेवाकडे दात, वरच्या व खालच्या दातांमध्ये मेल नसणे, दातांमधील फट, व इतर. हे काही दातांच्या चुकीच्या रचणे संबंधातील उदहारण आहेत.

असे दात असल्याने खाताना देखील काही जणांना त्रास होतो, बहुतेक लोक काही विशिष्ट प्रकारचे खाणं खाणे टाळतात. बऱ्याच अश्या लोकांना खाणे दातांमध्ये अड्डकण्याचे देखील अनुभव येतो. ह्यामुळे दातावर लवकर कीड पकडते आणि ते पुढे दुखण्याचे संभावना अधिक होते.

दात सरळ करणे हा एकमात्र मार्ग आहे जेणेकरून तुम्ही तुमचे हसणे सुंदर बनवू शकता. हे तुमचे मौखिक आरोग्य देखील उत्तम ठेऊ शकतात. आपण इथे ऑर्थोडोंटिक उपचाराचे सगळे प्रकार अगदी सविस्तरपने पाहणार आहोत, जे तुम्हाला चांगली माहीती देईल.

दातांची संरचना का बिघडते?

दातांची संरचना बिघडण्या मागे कोणतीपण कारणे असू शकतात.

काही मुख्य कारणे ही आहेत:

 • हीरड्या जास्त जाड असणे
 • दातांचे पडणे किंवा काढून टाकणे
 • लहानपाणी केलेल्या चुकीच्या सवयी जसं आंगठा तोंडात घालणे
 • अनुवांशिक
 • दातांना कीड पडणे

दातांना सरळ करणे का महत्वाचे आहे?

दातांची संरचना

दात सरळ केल्याने तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतात, त्यामध्ये खाली काही नमूद केले गेले आहेत:

 • दातांची रचना सरळ होते
 • दाट मध्ये अन्न अडकण्याची प्रकार फार कमी होतात
 • दातावर लवकर कीड पकडण्याचे प्रकार कमी होतात
 • जर तुमचे दात वेडेवाकडे असले कि तुम्ही हसणं टाळता, सरळ दात असल्याने तुम्ही खुलेपणाने हसू शकता
 • तुमचे हसणे फार सुंदर होते जो तुम्हाला एक नवा विश्वास देतो
 • तुमचा आतमविश्वास फार चांगलं होतो

दात सरळ करण्याचे कोण कोणते उपाय आहेत?

तुम्ही चांगल्या ऑर्थोडोंटिस्ट कढून दात सरळ करण्याची ट्रीटमेंट करू शकता. ते तुमच्या दातांची रचना पाहतील आणि त्यावर योग्य उपचार करतील. ऑर्थोडोंटिक उपचाराचे काही प्रकार आहेत. प्रत्येक प्रकारचे पद्धत जरी वेगळी असली तरी, सर्व प्रकार दात सरळ करतात.

दात सरळ करण्याचे काही प्रकार खाली सविस्तर दिले गेले आहेत:

मेटल ब्रेसेस

metal braces

मेटल ब्रेसेस हे मेटल चे बनवले असतात, ज्यामध्ये ब्रॅकेट्स असतात आणि अर्चवायर असते. ब्रॅकेट हे प्रत्येक दातावर ठेवले जातात आणि ते एका अर्चवायर ने जोडले गेले जातात. हे दातावर दबाव टाकतात आणि दातांना इच्छित ठिकाणी नेतात.

तुम्हाला मेटल ब्रेसेस केव्हाही काढणे शक्य नाही होऊ शकत. तुम्हाला काही दिवसांनी डेंटिस्ट कढे नक्की जावे लागेल, जे तुमच्या ब्रेसेस मध्ये हवी असलेली अडजस्टमेन्ट करून तुमच्या दातांना योग्य दिशेने नेते. मेटल ब्रेसेस ट्रीटमेंट जरी जुनी असली, तरी ते योग्य ट्रीटमेंट देण्याचे सामर्थ्य आहे. इतर पद्धतीच्या तुलनेत मेटल ब्रेसेस ट्रीटमेंट ला लागणारा खर्च फार कमी आहे.

सिरॅमिक ब्रेसेस

सिरॅमिक ब्रेसेस हे “सिरॅमिक” मटेरियल चे बनवले जातात आणि त्यांची उपचार पद्धत अगदी मेटल ब्रेसेस सारखी आहे. हे ब्रेसेस तुमच्या दातावर दबाव टाकून सरळ करण्याच्या दिशेने नेतात. सिरॅमिक ब्रेसेस हे लगेच नाही दिसत कारण ते पारदर्शक असतात. ह्या ट्रीटमेंट मध्ये मेटल ब्रेसेस ट्रेंटमेन्ट च्या तुलनेने थोडा जास्त खर्च होतो.

लिंगवल ब्रेसेस

लिंगवल ब्रेसेस ही अगदी मेटल ब्रेसेस सारखी बनवली गेली असते, ते फक्त दातांच्या आतल्या बाजूने लावले जातात. ते दातावर आतून दबाव टाकतात जेणेकरून दात योग्य दिशेने येऊ शकतात. हे ब्रेसेस ही लगेच नाही दिसून येत कारण ते दातांच्या आतल्या बाजूने लावले गेले असतात. लिंगवल ब्रेसेस ची किंमत ही मेटल ब्रेसेस आणि सिरॅमिक ब्रेसेस पेक्षा जास्त असते.

अलाइनर्स

अलाइनर्स प्लास्टिक ट्रेस सारखे बनवले गेले असते आणि ते दातांच्या रचणेप्रमाणे बनवले गेले असते. अलाइनर्स लगेच कुणाला नाही दिसून ते कारण ते पारदर्शक असतात आणि महत्वाचे म्हणजे ते तुम्हाला स्वतः काढून परत लावता येते. हे तुमच्या दातावर दबाव टाकून सरळ करतात आणि अगदी सोयीस्कर पद्धतीने ते केले जाते. इतर ऑर्थोडोंटिक उपचाराच्या तुलनेत अलाइनर्स ला फार जास्त खर्च होतो. ही ट्रीटमेंट प्रक्रिया बऱ्याच लोकांना फार सोयीस्कर वाटते म्हणूनच ह्या ट्रीटमेंट पद्धतीला आता मागणी वाढत चालली आहे.

वरील नमूद केलेली कोणतीही पद्धत तुम्ही तुमच्या बजेट आणि सोयी अनुसार निवडू शकता. जरी तुम्ही कोणतीही पद्धत निवडली तरीही, हे तुमच्या चुकीच्या दातांची संरचना जसे पुढे असलेले दात, वेडेवाकडे दात, वरच्या व खालच्या दातावर मेल नसणे, दातांमधील फट, व अन्य बरे करू शकतात.

जर तुम्हाला तुमचे हसणे अधिक सुंदर करायचे असेल तर ऑर्थोडोंटिस्ट कडे जाणे गरजेचे आहे. ते तुमचे दात तुमच्या निवडलेल्या पद्धतीने अगदी चांगल्याप्रकारे करून देतील. लवकर ऑर्थोडोंटिक ट्रीटमेंट ने दातावर उपचार करा, जे तुमचे दात सरळ करून तुमचे हसणे अधिक सुंदर करतील.

तज्ञांचे मत

दातांची चुकीची रचना तुमचे हसणे अगदी अवघड करून टाकेल आणि अन्य मौखिक आरोग्य संबंधातील समस्या उद्भयु शकता. म्हणून ऑर्थोडोंटिक ट्रीटमेंट ने दात सरळ करून घेणे महत्वाचे आहे, जे तुमचे हसणे फार सुंदर करेल.

About Author

Share

Your email address will not be published. Required fields are marked *

Sabka dentist Clinics