रूट कॅनल उपचार महत्वाचे का आहे?

Talk to a Dentist Now!

सर्वांना हसरा चेहरा प्रिय असतो दातांच्या स्वास्थ्यामुळे हसरा चेहरा अधिकच सुंदर दिसतो त्यामुळे दातांचे आरोग्य टिकविणे फार जरुरी आहे दातांचे आरोग्य ठीक नसल्यास अनेक आजार होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे दैनिक दिनचर्येत दातांचे आरोग्य टिकविणे जरुरी आहे.

दातांना कीड लागणं हा तोंडामधील जीवाणुंमुळे होणारा आजार आहे. तोंडात असलेले जीवाणू दातांवर साचून राहिलेल्या अन्नकणांमधील साखरेवर प्रक्रिया करून आम्ल तयार करतात आणि या आम्लामुळे दातांच्या पृष्ठभागावरचं आवरण विरघळायला सुरुवात होते. ही प्रक्रिया हळूहळू पण सतत सुरू राहते.

या आवरणाला पडलेल्या छिद्रामध्ये अजून अन्नकण अडकतात. छिद्र वाढत राहतं. दातांचा पृष्ठभाग पोखरला जातो आणि मग दाताला मोठा खड्डा पडतो. त्यालाच कॅव्हिटी म्हणतात. ही कॅव्हिटी आकाराने लहान असतानाच ती दंत चिकित्सकाकडून भरून घेणं उत्तम.

रूट कॅनल उपचार म्हणजे नेमके काय?

rct

रुट कॅनल ही दातांच्या उपचारांसाठी करण्यात येणारी एक उत्तम पद्धत आहे. या उपचारांबाबत तुम्हाला सर्व माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे.

या उपचारात दात वा दाढेच्या किडलेल्या भागातून मुळामध्ये असलेल्या रूट कॅनलपर्यंत जाऊन जंतुसंसर्ग झालेला पल्पचा भाग साफ केला जातो आणि तिथली पोकळी र्निजतुक केली जाते. जंतुसंसर्ग झालेला पल्पचा भाग काढून टाकताना मधूनमधून दातात जंतुनाशक औषधांचा फवारा केला जातो.

रूट कॅनलच्या निर्जन्तुक झालेल्या पोकळीत गटा पर्चा नावाचे औषधी कोन भरले जातात व त्या पोकळीचे फिलिंग केले जाते. या संपूर्ण प्रक्रियेला रूट कॅनल फिलिंग असे म्हणतात.

रूट कॅनल उपचार च्या पायऱ्या कोणत्या आहेत?

1. दातांची योग्य चाचणी करणे

सर्वप्रथम डेंटिस्टकडून दातांची योग्यप्रकारे तपासणी केली जाते. ह्यामध्ये दातांमधली असलेली समस्या बघितली जाते आणि इन्फेकशन किती आहे हे बघितले जाते. त्याचबरोबर तुमच्या दातांची संरचना देखील बघितली जाते.

तुमचा दात किती प्रमाणात खराब झाला त्याची पूर्ण खात्री झाल्यावर मग रूट कॅनल उपचार सुरु केले जातात हा उपचार दोन ते तीन भेटीत केले जाते, तुम्ही तुमच्या निवडीनुसार अपॉइंटमेंट घेऊ शकता.

2. दातांना सुन्न करणे

रूट कॅनल ट्रीटमेंट दरम्यान दात फार दुखतात आणि त्यामुळे त्या व्यक्तीला त्रास संभवतो. हा उपचार पद्धतीत तुमचा दात किडला असल्यास प्रथम अँटिबायोटिक्स (प्रतिजैविके) देऊन त्यामधील वेदना व सूज कमी करण्यात येते. दात मुळापासून स्वच्छ केल्यानंतर मुळांमध्ये पुन्हा इनफेक्शन होऊ नये यासाठी साहित्य भरण्यात येते.

3. दातांवरची कीड आणि पल्प साफ करणे

सर्वप्रथम तज्ज्ञ दाताच्या (क्राऊन) या भागातून यंत्राद्वारे छिद्र करतात व त्या छिद्रातून पल्पपर्यंत मार्ग काढतात. फाइल, रिमर, ब्रोश इत्यादी लहान लहान उपकरणाच्या साहाय्याने संसर्गजन्य पल्प काढून टाकतात.

4. डेंटल कॅप लावणे

रूट कॅनल उपचार पूर्णपणे झाल्यावर त्यावर डेंटल कॅप लावणे गर्जेचे आहे. हे तुमचे दात अधिक खराब आणि सडण्यापासून वाचवतात. डेंटल कॅप हि वेगळ्या प्रकारचे असतात, जे तुम्ही आवडीप्रमाणे निवडू शकतात.

रूट कॅनल उपचाराच्या ह्या साध्या पायऱ्या आहेत, जे तुमचे उपचार उत्तमपणे करते.काही वेळा दुखावलेला दात रुट कॅनल उपचार केल्यावर देखील पुर्ण वेदनारहीत होण्यास वेळ जातो.दातांच्या कॅपखाली असलेल्या सूजेमुळे चावल्यावर वेदना जाणवू शकतात.

खाण्यामध्ये तुम्हाला काही दिवस योग्य नियम पाळावे लागेल, जे तुम्हाला काही प्रमाणात दुखण्यापासून वचावतील. रूट कॅनल ने तुम्ही तुमचे दात अधिक सडण्यापासून वाचवू शकाल उपचारांनंतर अन्नपदार्थ चावताना त्या भागावर येणारा दाब सहन करता यावा यासाठी त्यावर कॅप बसवण्यात येते. हा दाब सहन करण्यासाठी व दातांचे कार्य सुरळीत होण्यासाठी डेटिस्ट तुम्हाला मेटल,सिरॅमिक अथवा इतर पदार्थांची कॅप बसवण्याचा सल्ला देतात.

रूट कॅनल ट्रीटमेंट चे कोण कोणते फायदे आहेत?

dental checkup

रूट कॅनल उपचाराचे काही फायदे खाली नमूद केले गेले आहेत:

 • रूट कॅनल इलाजाचा तोटा तर काहीच नसतो, कारण या उपचाराने खूप किडलेली, मुळापर्यंत जंतुसंसर्ग झालेली दाढ वा दात वाचवला जातो. त्यामुळे झालाच तर नैसर्गिक दात वा दाढ टिकण्याचा फायदाच होतो.
 • रूट कॅनल उपचारात कुठला धोकाही नसतो.
 • रूट कॅनल ट्रीटमेंट ने तुमचे दात काढणे टाळले जाते
 • या उपचाराने तुमचे दात वेदनारहित होतात आणि तुम्ही बरेचसे अन्न पदार्थ चांगल्या प्रकारे खाऊ शकतात
 • या उपचाराने तुम्ही तुमचं मौखिक आरोग्य उत्तमपणे बर्याच काळासाठी ठेऊ शकता

रूट कॅनल उपचारासाठी किती दिवस लागतात?

आजकाल उपलब्ध असलेल्या आधुनिक अवजारांच्या साहाय्याने रूट कॅनलचे उपचार एका व्हिजिटमध्येही करता येतो; परंतु खूप ठणकणाऱ्या आणि सुजलेल्या दातांना दोन वा प्रसंगी तीन व्हिजिटदेखील लागू शकतात.

पूर्वी रूट कॅनल सारख्या उपचाराला ४ पेक्षा अधिक वेळा डेंटिस्टकडे जावे लागत. परंतु आता हे अधिक सोपे झाले आहेत. तुम्हला आता एका दिवसातही रूट कॅनल उपचार पूर्णपणे करून भेटते. जर दातांची रचना किंवा इन्फेकशन जास्तं असेल तर डेन्टिस्टकढे तुम्हाला जास्तं वेळा जावं लागेल.

असं केल्याने तुमचं रूट कॅनल चे काम खूपच चांगल्यारित्या होऊ शकेल. उपचाराळ किती दिवस लागतील, हे डेंटिस्टकडून तपासणी झाल्यावर अगदी अचूक सांगू शकतात.

रूट कॅनल उपचार झाल्यावर काय काळजी घ्यावी लागेल?

रूट कॅनल उपचार घेतल्यावर डेंटिस्ट च्या सल्याने तुम्ही तुमच्या दातांची काळजी घेऊ शकता तसे केल्याने तुम्ही दात उत्तम ठेऊ शकता.

रूट कॅनल उपचार केल्यावर खाली निम्नलिखित काळजी घेणे महत्वाचे आहे:

 • दिवसातून डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे दिवसातून २ ते ३ वेळा ब्रश करावा
 • काही दिवस उपचार केलेल्या वेगळ्या बाजूने अन्न चावावे.
 • डेंटल कॅप लवकरात लवकर लावा वी, जेणेकरून तुमच्या दाताला चांगली सुरक्षा मिळेल.
 • अधिक गरम पदार्थ खाणे काही दिवस टाळावे.
 • उपचारानंतर काही दिवस अधिक कडक खाद्य चावणे टाळावे.
 • दाताला काही दुखणे असल्यास लवकरात लवकर डेंटिस्ट ला जाऊन भेटा.

रूट कॅनल हि एक फार चांगली उपचार पद्धत आहे, जे तुमचं दातांचे अधिक किडणे थांबवू शकतात. रूट कॅनल उपचार हे मौखिक आरोग्यासाठी जणू एक वरदानच ठरले आहे.

तज्ञांचे मत:

जर तुम्ही किडलेल्या दातांच्या समस्यांनी त्रस्त असाल तर लवकरात लवकर डेंटिस्टकडे तपासून घ्या. जर तुम्हला रूट कॅनल उपचार सुचवले गेले तर लवकरच करून घ्या, जे तुमचे दात वाचवू शकेल.

About Author

Share

Your email address will not be published. Required fields are marked *

Sabka dentist Clinics